Geetashastra
-
- 21,99 €
-
- 21,99 €
Beschreibung des Verlags
भगवद्गीतेचे सिद्धांत हे त्रिकाल बाधित आहेत. दुःख व संकट यावर मात करून आनंदाचा मार्ग योजण्याचे काम गीता करते. गीता हा मानवतेचा महान ग्रंथ आहे. प्राप्त जीवन समृद्धपणे कसं जगावं आणि सर्वोत्परी उत्कर्ष कसा साधावा ? याचे मार्गदर्शन गीता करते. गीता अंधविश्वासाला थारा देत नाही . तिचे तत्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. पण हिंदू धर्माचं मात्र ते भूषण आहे. वेदोपनिषधांतील सिद्धांत , पुराणकथा , वैज्ञानिक सिद्धांत ,खगोलशास्त्र इतर कथा ,अनेकविध नवे दृष्टांत, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं यांची पुष्टी या ग्रंथात केली आहे. शत्रूच्या भूमिकेतून कोणी आप्त स्वकीय जरी समोर राहिला तर त्याला विशाल अंतकरणाने क्षमा करावी . मात्र त्याच्याविषयी अनुकंपा बाळगताना पूर्वस्मृतीच्या आहारी जाऊन मोहवश आणि शोकवश होऊ नये , अन्यथा आपलं मन कमकुवत होतं , हा या गीतेचा मूळ सारांश .