वैदिक नक्षत्र ज्योतिष
-
- ¥1,200
-
- ¥1,200
Publisher Description
हे पुस्तक म्हणजे तुमचा रोजचा मित्र आणि मार्गदर्शक आहे. पहिल्यांदा हे पुस्तक आनंदी जीवनाची ७ तत्वे विशद करते. त्यानंतर ते वेद हे संपूर्ण शास्त्र कसे आहे ते सांगते. शेवटी ते रोजच्याकरिता ज्योतिषाचे मार्गदर्शन करते. यामध्ये मुहूर्त, गुणमेलन, गोचर अश्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर विविध उपायांचा सुद्धा समावेश आहे.
प्रत्येक नक्षत्राला एक देवता आणि चिन्ह आहे. या देवतांबरोबर विविध कथा जोडलेल्या आहेत. हा ग्रंथ अश्या कथांचे गूढार्थ प्रकाशात आणतो. सगळ्या नक्षत्रांच्या नावाचे व चिन्हांचे विशेष अर्थ आपल्यासमोर ठेवतो. या ग्रंथात अनेक ठिकाणी वेदांमधील मूळ संदर्भ दिले आहेत.
प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तीचा स्वभाव आणि नक्षत्राचे कारकत्व मूळ संदर्भासह दिले आहे.
प्रत्येक नक्षत्राचा आराध्यवृक्ष त्याचे आयुर्वेदीय गुणधर्म आणि उपचार दिले आहेत. नक्षात्रावृक्षानुसार जमिनीतील पाण्याचे स्रोत शोधण्याचा मार्ग दिला आहे.
प्रत्येक हिंदू सण नक्षत्रावर अवलंबून असतो. कोणताही सण एका ठराविक दिवशीच का असतो हा प्रश्न आपल्याला या पूर्वीही पडला असेल. हे पुस्तक या कोड्याचे उत्तर देते. कोणत्याही सणाचा आपल्या प्रगतीसाठी कसा उपयोग करायचा याचाहीमार्ग हे पुस्तक सांगते.
आजच्या काळात आपल्यातील अनेकांना खगोलशास्त्र किंवा आकाशदर्शन करण्यामध्ये रुची असते म्हणून प्रत्येक नक्षत्राची खगोलशास्त्रीय माहिती इथे दिली आहे.
नक्षात्रावर आधारीत ज्योतिषावरील एक सर्वांगसुंदर मार्गदर्शक आहे. हा ग्रंथ रोजच्या जीवनातील संदर्भ ग्रंथ सुद्धा आहे. हा आपल्याला आपले व्यक्तिमत्व उन्नत करण्यास विशेष उपयुक्त ठरेल आणि आपले जीवन आनंददायी करेल यात शंका नाही.