



The Envy Of Moon-मेरे रशके कमर
-
- 25,00 kr
-
- 25,00 kr
Publisher Description
सदर कथा ही स्त्रीप्रधान भूमिका असलेल्या, यशस्वी आणि कर्तबगार मुलीविषयी आहे. जी स्वतः स्वयंपूर्ण आहे आणि दुर्बल मानसिक जडणघडण असलेल्या समाजात वावरत असतांना प्रेम निवडावे किंवा आपली प्रतिष्ठा, यासंदर्भात नायिकेच्या मनात घालमेल होते. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर ती आपला निर्णय घेते. ती कोणता निर्णय घेते हे वाचकांना कथाभाग वाचून कळेलच.
स्त्रियांच्या बाजूने नुसते दिखाव्याला का होईना समाज बाजू घेत असतो. त्यामुळे स्त्रियांचा विकास होऊनसुद्धा स्त्री जातीला आपल्या बंधनात ठेऊन घेण्याचा प्रकार पुरुष वर्गाकडून केला जातो. व पुरुषवर्गाचा तिटकारा म्हणून स्त्री ही नेहमीच आपली भूमिका कठोर निर्णयात रुपांतरीत करते. मग या कठोर वर्तनात वा निर्णयात सुसंस्कृत पुरुषवर्ग सुद्धा होरपळतो. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री वर्गाची ससेहोलपट होतेच. अशा अनेक न्याय – अन्यायाच्या गोष्टी स्त्री-पुरुष नाते संबंधात आहे.