



Data - New Oil and Soil
-
- $4.99
-
- $4.99
Publisher Description
फेसबुकच्या डेटा पॉलिसीबद्दल दरारोज जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात चर्चा चालू असते. फेसबुक युजर्सची माहिती वापरण्याची फेसबुकची धोरणे आणि युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा या चर्चेचा केंद्रबिंदू असतो. गेल्या आठवड्यातच आलेली एक बातमी अशी, की आयर्लंड या देशाच्या डेटा कायद्यानुसार माहितीचा गैरवापर केल्यामुळे फेसबुकला १७ मिलियन डॉलर्सचा दंड भरावा लागला आहे. या बातमीनंतर पुन्हा एकदा फेसबुककडून होणाऱ्या माहितीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पण या सगळ्या संशयाच्या मृगजळाची सुरुवात झाली ती केम्ब्रिज अनॅलिटीका प्रकरणापासून. डेटाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेल्याचं समोर आल्यानंतर फेसबुकच्या विरोधात जगभरात वातावरण तयार झालं. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो फेसबुक, गुगल आणि यांच्यासारख्या इतर कंपन्यां मिळवता असलेल्या डेटाचा. हा डेटा वापरण्याची परवानगी कंपन्यांना देताना युजर्सनी काय काळजी घेतली पाहिजे, आणि डेटाच्या वापरातून तयार होणाऱ्या अचाट शक्यता पाहता, त्यापासून दूर राहणं शक्य आहे की नाही, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत… चला तर मग!