HALDIRAM
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
ही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्यानं एक प्रचंड मोठा खाद्य पदार्थ व्यवसाय उभा केला. राजस्थानातील एका छोट्याशा संस्थानात– बिकानेरमध्ये– हाQल्दरामनं शेव हा खाद्य पदार्थ करून विकायला सुरुवात केली, तेव्हा तो विशीच्या आतला विवाहित तरुण होता. स्वतःच्या अक्कलहुशारीच्या बळावर त्यानं व्यवसायाची भरभराट केली. बिकानेरमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी कोलकात्यामध्ये आपल्या व्यवसायाची नव्यानं मुहूर्तमेढ रोवली आणि तिथल्या मारवाडी लोकांच्या रसनेला एक वेगळाच, चटकदार पदार्थ– भुजिया– पुरवला. भरपूर शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि गिNहाइकांना आवडेल असा चटपटीत, खमंग अन् खुसखुशीत खाद्य पदार्थ देण्याची प्रबळ इच्छा अन् त्याच्या जोडीला धोका पत्करण्याची धाडसी वृत्ती, एवढ्याच भांडवलावर हाQल्दरामनी जी उत्तुंग भरारी मारली, त्याची कहाणी म्हणजेच हाQल्दराम. हाQल्दरामांच्या हयातीतच त्यांच्या व्यवसायाची भरपूर भरभराट झाल्याचं भाग्य त्यांनी अनुभवलं. त्यांच्या एका नातवानं– शिवकिशननं– नागपुरात स्वतःचा व्यवसाय सुरू केला, शेव बनवण्याच्या व्यवसायात नवे खाद्य पदार्थ – काजू कतलीसारखी मिठाई– निर्माण करण्याचं धाडस केलं, उपाहारगृहं काढून व्यवसायाचं आणखी एक दालन उघडलं. त्यांच्या दुसNया एका नातवानं, मनोहरलालनं थेट राजधानी दिल्लीवर स्वारी केली आणि बघताबघता तेथील लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. इतवंÂच नव्हे, तर काही वर्षांच्या आतच व्यवसायाचा झेंडा देशाबाहेरही फडकवला.