DUSARE JAGTIK MAHAYUDDHA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांमुळे जर्मनीची दुर्दशा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जर्मन तरुणांच्या मनात सुडाचा अंगार पेटला होता. अशा परिस्थितीत नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर पार्टीची स्थापना झाली. त्याचा पुढारी म्हणून हिटलरची निवड झाली. त्याने कपटाने जर्मनीचं अध्यक्ष आणि पंतप्रधानपद मिळवलं. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. हॉलंड, बेल्जियम, इटली, आफ्रिका इ. अनेक राष्ट्रांचा युद्धात सहभाग होत गेला. ते युद्ध कशा तऱ्हेने झालं, कोणाची सरशी झाली, कोण हरलं, त्या त्या युद्धाचे त्या त्या देशावर, बेटावर किंवा एखाद दुसऱ्या शहरावर काय परिणाम झाले, या युद्धाशी संबंधित प्रमुख व्यक्तींनी (जर्मनचा राष्ट्राध्यक्ष हिटलर, इटलीचा पंतप्रधान मुसोलिनी इ.), त्यांच्या स्वभावानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांचे झालेले चांगले/वाईट परिणाम, सागरी लढाई, विमानातून झालेली लढाई, जमिनीवरील लढाई अशा तीन प्रकारे झालेल्या लढाईचे आकडेवारीनिशी संदर्भ इ. माहिती इत्थंभूतपणे देणारं पुस्तक आहे ’दुसरे जागतिक महायुद्ध.’