EKVACHANI EKVACHANI

EKVACHANI

    • $7.99
    • $7.99

Publisher Description

हिंदुत्वाच्या जोरावर ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि केंद्रातही शिवसेनेला सत्तेत आणलं, त्या शिवसेनेचा अनेक वर्षं चेहरा असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या परखड मुलाखती ‘एकवचनी’ या पुस्तकात संजय राऊत यांनी एकत्र केल्या आहेत. बाळासाहेबांचा सडेतोड स्पष्टवक्तेपणा जो जगद्विख्यात होता, तो विशेषत्वाने या मुलाखतींमध्ये जाणवला आहे. कडवा हिंदुत्ववाद, दंगली, गँगवार याविषयी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. शरद पवार, सोनिया गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांसारख्या नेत्यांवर प्रखर टीका केली आहे. पक्षांतर करणाऱ्या छगन भुजबळांसारख्या नेत्याचेही त्यांनी वाभाडे काढले आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्यांवरही त्यांनी आपली मते मांडली आहेत. शिवसेना मतभेद, भाजपबरोबर असणारे सबंध या राजकारणाशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देतानाच देवधर्म, नास्तिकता, श्रद्धा, कुटुंब यांविषयीही ते भरभरून बोलले आहेत. मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणाNया बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या मुलाखतींमधून समोर येतात. शिवसेनेची धोरणं, शिवसेनेचे आचारविचार, अपेक्षा यांसोबतच शिवसेनेचा इतिहास, भविष्यकाळ या सर्वांविषयी बाळासाहेबांची मतं आणि विचार या मुलाखतींमधून प्रकट होतात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2002
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
844
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
8.6
MB

More Books by Sanjay Raut