GAHAN PADLELI TEKADI
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
गहाण पडलेली टेकडी हा आदिवासी स्त्रियांच्या कहाण्यांचा संग्रह. या कहाण्या मारिजा स्रेस यांनी त्या अदिवासींमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन, त्यांच्यात राहून लिहिल्या आहेत. ‘इथं तर हे नेहमीचंच’ या कथेतील मुकादम आणि ठेकेदाराच्या पाशवी वासनेला बळी पडून जीव गमवावी लागलेली नुकतीच वयात आलेली लाली...‘ठेवलेली बाई’ कथेतील पहिला नवरा गेल्यावर नाईलाजाने दुसरं लग्न करावं लागलेली आणि दुसऱ्या नवऱ्याने बाई ठेवली आहे, हे कळल्यावर बंड करू पाहणारी खातरी...‘दुभती गाय’ कथेतील आदिवासी स्त्रियांना हाताशी धरून गावात दूध सोसायटी उभी करू पाहणाऱ्या मीराबेनला पुरुषी मानसिकतेचा करावा लागणारा सामना...‘जो मैं ऐसा जानती’ कथेतील तारुण्यात पाय घसरलेली, पण नंतर नेकीने संसार करणारी मकू...‘बदलत्या काळाची पावलं’मधील ठार मारू पाहणाऱ्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटून आलेली, नंतर नानजीशी लग्न करून सुखाचा संसार करताना गावातील बायकांचा उद्धार करू पाहणारी फूली...काही शोषित आणि काही संघर्ष करू पाहणाऱ्या आदिवासी स्त्रियांचं वास्तव विश्व.