GRAMINTA : SAHITYA AND VASTAV

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

भारतीय संस्कृतीचे मूळ क्षेत्र ग्रामजीवन हे आहे.भारतीय खेडी ही शहरांच्याही अगोदरची असून वेदकाळापासून आस्तित्वात आहेत. हजारो वर्षे आस्तित्वात असलेल्या या खेड्यांतून आजही लोकसंस्कृतीचे झरे वाहताना दिसतात. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामजीवनाला सरकारी पातळीवर कागदोपत्री तरी  चांगले दिवस आले.लोकशाही आली आणि खेडी जागी होऊ लागली. या जागृतीची एक खूण म्हणजे एकोणीसशे साठनंतरचे ग्रामीण साहित्य होय. आज ते नव्या उन्मेषाने अवतरू पाहते आहे. या नव्या वाटचालीत ग्रामीण साहित्याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात, उपास्थित केले जातात. संक्रमण अवस्थेच्या या काळात अनेक वाङ्मयबाह्य हेतूंनी ग्रामीण साहित्याविषयी गैरसमजही पसरविले जातात. ग्रामीण साहित्य आणि सामाजिक वास्तव यांचा एक अतूट संबंध आरंभापासून आहे. ग्रामीण साहित्यविषयक या विविध प्रश्नांची उत्तरे काय असू शकतील - वाङ्मयीन समस्यांचे तात्त्विक स्वरूप काय असू शकेल -ग्रामीण साहित्य आणि खेडे यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे - शहर आणि ग्रामीण साहित्य यांचे नाते काय - इत्यादी विविध प्रश्नांची, समस्यांची, संबंधांची, कसांची वाङ्मयीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या तात्विक मूलगामी चर्चा करणारा हा ग्रंथ आहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1981
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
186
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.2
MB

More Books by Anand Yadav

1990
2012
2012
2010
2012
1979