



JAICHI SUGANDHI PHULE
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
किसन दगडू शिंदे हे निवृत्त इंजिनिअर. एका चर्मकार कुटुंबात किसन यांचा जन्म. घरची गरिबी. आई-वडिलांचं अगदी थोड्या अंतराने अकाली निधन. शिक्षक-नातेवाइकांच्या सहकार्याने आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई (स्थापत्य) ही पदवी प्राप्त. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीचा श्रीगणेशा, अहमदनगर, नागपूर, पुणे इ. ठिकाणी झालेल्या बदल्या, त्या ठिकाणचे अनुभव, मिळत गेलेल्या बढत्या, कार्यकारी संचालक म्हणून निवृत्ती, या व्यावसायिक वाटचालीबरोबरच विवाह, पत्नी, अपत्यप्राप्ती, एकूण कौटुंबिक वाटचाल, नातेवाईक, मित्र, जीवनातील चढ-उतार, जीवनाविषयीचं चिंतन, नातेसंबंधांबाबतचे विचार, निवृत्तीनंतरचे जीवन इत्यादीचा लेखाजोखा म्हणजे त्यांचं आत्मकथन जाईची सुगंधि फुले. एका मागासवर्गात जन्मलेल्या मुलाने स्वकर्तृत्वाने कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी संचालक पदापर्यंत केलेला यशस्वी प्रवास.