KALI RANI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
"रत्नाकर मतकरी यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच पार पडले. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. मतकरी यांनी काही काळ बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ साहित्य, रंगभूमी, दूरदर्शन व चित्रपट अशा विविध माध्यमांतून लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून काम केले. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललित लेख अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल व दर्जेदार लेखन केले. नाट्यलेखन, निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य - वेषभूषा रेखाटन आणि अभिनय या क्षेत्रांतही त्यांनी अत्यंत निष्ठेने आपली कामगिरी बजावली. १६ फेब्रुवारी, १९५५ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ‘वेडी माणसं’ ही मतकरी यांची एकांकिका प्रथम प्रसारित झाली. तेव्हापासून पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांची समृद्ध कारकीर्द बहरतच गेली. मतकरी यांचा साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी या मान्यवर संस्थांप्रमाणे राज्य सरकारनेही त्यांच्या साहित्यकृतींसाठी विविध पुरस्कारांनी गौरव केला होता. पत्नी प्रतिभा मतकरी यांच्या मदतीने त्यांनी ‘बालनाट्य’, ‘सूत्रधार’ आणि ‘महाद्वार’ अशा तीन नाट्य संस्था सुरू केल्या. प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, चैतन्य, उपक्रमशीलता तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता हे मतकरींच्या कलावंत व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू होते. राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. " ****** RATNAKAR MATKARI WAS BORN IN MUMBAI. HIS SCHOOL AND COLLEGE EDUCATION TOOK PLACE IN MUMBAI ITSELF. HE EARNED HIS DEGREE IN ECONOMICS. MATKARI WORKED AT THE BANK OF INDIA FOR SOME TIME. FOLLOWING THAT, HE WORKED FULL-TIME ACROSS VARIOUS MEDIUMS SUCH AS LITERATURE, THEATRE, TELEVISION, AND CINEMA AS A WRITER, PRODUCER, DIRECTOR, AND PAINTER. HE PRODUCED ABUNDANT AND HIGH-QUALITY WRITING ACROSS VARIOUS LITERARY GENRES INCLUDING PLAYS, ONE-ACT PLAYS, CHILDREN'S PLAYS, STORIES, NOVELS, AND LIGHT ESSAYS. HE PERFORMED HIS DUTIES WITH UTMOST DEDICATION IN THE FIELDS OF PLAYWRITING, PRODUCTION, DIRECTING, SET AND COSTUME DESIGN, AND ACTING. ON FEBRUARY 16, 1955, MATKARI'S ONE-ACT PLAY VEDI MANSA WAS FIRST BROADCAST FROM THE MUMBAI STATION OF AKASHWANI (ALL INDIA RADIO). EVER SINCE, HIS RICH CAREER FLOURISHED FOR OVER FIFTY YEARS. LIKE ESTEEMED ORGANIZATIONS SUCH AS THE SAHITYA AKADEMI AND THE SANGEET NATAK AKADEMI, THE STATE GOVERNMENT ALSO HONORED MATKARI WITH VARIOUS AWARDS FOR HIS LITERARY WORKS. WITH THE HELP OF HIS WIFE PRATIBHA MATKARI, HE STARTED THREE THEATRE ORGANIZATIONS: 'BALNATYA', 'SUTRADHAR', AND 'MAHADWAR'. EXPERIMENTATION, RELENTLESS PRODUCTION ENERGY, VITALITY, INITIATIVE, AS WELL AS INTROVERSION AND SOCIAL ORIENTATION WERE SPECIAL FACETS OF MATKARI'S ARTISTIC PERSONALITY. THE NATAVRATNA PRABHAKAR PANSHIKAR RANGBHUMI LIFETIME ACHIEVEMENT AWARD, CONFERRED BY THE STATE GOVERNMENT, HAS BEEN ANNOUNCED FOR HIM POSTHUMOUSLY.