MAHAMANAV SARDAR PATEL
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
श्री. दिनकर जोषी यांचे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे झाले आहे. ‘चरित्रात्मक कादंबरी’ हा साहित्यप्रकार गुजराती साहित्यविश्वात त्यांनी प्रथमच आणला आणि रूढ केला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आचार्य द्रोण, तथागत बुद्ध, गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, कवी नर्मद, महंमद अली जीना, महात्मा गांधीपुत्र हरिलाल गांधी अशा वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या स्वभावप्रकृतीच्या व्यक्तींचे कादंबरीच्या आकृतिबंधातून केलेले चरित्रचित्रण मराठी वाचकांनी यापूर्वी अनुभवलेले आहे. महामानव कादंबरीतून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे जीवितकार्य वाचकांपुढे ठेवले आहे. यशस्वी बॅरिस्टर असलेल्या वल्लभभाई झवेरभाई पटेलांचा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षापर्यंत भारतातील राजकारणाशी दुरून परिचय होता; परंतु थेट संबंध आला नव्हता. गांधीजींच्या प्रभावी व्याQक्तमत्त्वाने भारावून जाऊन ते काहीशा अनपेक्षितपणे राजकारणात उतरले. त्यानंतर मात्र त्यांनी तनमनधनाने भारतासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यातला प्रेमळ पिता, कर्तव्यदक्ष बंधू, कणखर, निर्भीड राजकारणी, तत्त्वनिष्ठ नेता लेखकाने विविध प्रसंगांतून रंगवला आहे. देशातील तसेच जगातील राजकीय आणि सामाजिक परिाQस्थतीची त्यांची विलक्षण जाण, देशबांधवांसाठीची आणि देशाच्या कल्याणासाठीची आंतरिक तळमळ, गांधीजींच्या ठायी असलेली त्यांची निष्ठा आणि त्यातून आलेला, त्यांच्या ‘लोहपुरुष’ प्रतिमेशी वरकरणी सुसंगत न वाटणारा अति हळवेपणा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण लेखकाने केले आहे. फाळणी स्वीकारून मिळालेल्या विभाजित भूभागातून सार्वभौम भारत राष्ट्राची निर्मिती होणे शक्य नाही; देशभर विखुरलेली ५६२ संस्थाने जोपर्यंत स्वतंत्र भारतात विलीन होत नाहीत, तोपर्यंत भारत हा एकसंध देश, एक राष्ट्र म्हणून कधीच आQस्तत्वात येऊ शकणार नाही, या गोष्टीचे त्यांना सर्वांगीण भान होते. संस्थानांचे विलीनीकरण हा त्यांच्या कार्यातील मानाचा तुरा ठरला. या विलीनीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अमलात आणलेले डावपेच, दाखवलेला मुत्सद्दीपणा, धोरणी दीर्घदृष्टी, प्रसंगी कारवाई करण्याचे त्यांचे धाडस इत्यादी पैलू लेखकाने निरनिराळ्या प्रसंगांतून सविस्तरपणे वर्णिले आहेत. जवाहरलाल नेहरू आणि गांधीजी यांच्याशी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरदारांचे तात्विक मतभेद झाले असले, तरी या दोघांविषयीचा त्यांचा आंतरिक जिव्हाळा किती सच्चा होता, हे लेखकाने अनेक प्रसंगांतून चित्रित केले आहे. हातातोंडाशी आलेला पंतप्रधानकीचा प्याला गांधीजींच्या इच्छेखातर त्यांनी अत्यंत सहजपणे सोडून दिला, हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याला साजेसेच होते.