NO NOT NEVER
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
ही कहाणी आहे वNहाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती नसतानाही मंकीच्या वडिलांच्या दयेमुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळते. बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी या दोघी पुण्यासारख्या महानगरात दाखल होतात. या महानगराचे रागरंग, इंजिनिअरिंग महाविद्यालयातील खळबळजनक वातावरण आणि दोघींचा परस्परविरोधी स्वभाव यातून या कथानकाला वेगवेगळी वळणं मिळत जातात. स्वैर, उच्छृंखल मंकी आपल्या अनिर्बंध जगण्यासाठी वेळोवेळी राणीला वेठीस धरते. आणि राणीचं पुण्यातलं जगणं आव्हानांनी भरून जातं. तरुणाईची मानसिकता आणि मोकळ्या अवकाशात मिळालेलं स्वातंत्र्य यांचा सुरस मेळ असणारी, कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच आणणारी विलक्षण कादंबरी.