SAKARATMAK JAGNYACHA SAHAJMARG
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
विख्यात लेखिका व व्यावसायिक असलेल्या जेनी हेअर यांनी त्यांच्या ‘सिंपल स्टेप्स टू पॉझिटिव्ह लिव्हिग’ या पुस्तकामध्ये केवळ सकारात्मक विचारसरणीचे स्तोम न माजवता व्यक्तिगत पातळीवर अधिक सकारात्मक राहून आपले आयुष्य अधिक संपन्न कसे करावे, ते सांगितले आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये जेनी हेअर यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव प्रतिबिंबित होतो. याचे कारण असे की, त्यांनी केवळ तथाकथित ‘सकारात्मक विचारसरणीवर’ अतिरिक्त जोर न देता, कोणत्या पद्धतीने आयुष्य जगल्यास आपल्याला आयुष्याचा आनंद घेता येईल व आपले व आपल्या प्रियजनांचे आयुष्य समृद्ध करता येईल, हे काही अत्यंत उपयुक्त व व्यावहारिक सल्ल्यांच्या व मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे. स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल कसा घडवून आणायचा इथपासून, आपल्या कामाचा/व्यवसायाचा आनंद आपण कोणत्या रीतीने घेऊ शकू याविषयीचे विस्तृत विवेचन अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.