VEGLA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
"स्वर्गीय 'गुरुदत्त' यांना समर्पित आणि इस्मत चुगताईजींच्या 'अजीब आदमी' कादंबरीवर आधारित 'वेगळा' हा मराठी अनुवाद हिंदी सिनेसृष्टीच्या ब्लॅक अँड व्हाइट काळाचे आणि तत्कालीन संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण मांडतो. कादंबरीचा नायक धर्मदेव बॉम्बे टॉकीजपासून संघर्ष करत यशस्वी दिग्दर्शक बनतो, जिथे त्याचे जीवन चित्रपटसृष्टीतील विविध अभिनेत्रींशी जोडले जाते. चित्रपटांतील चकाकणारे विश्व, त्यामागचे कष्टाळू जीवन आणि कलाकारांचे व्यावसायिक व वैयक्तिक संबंध यावर यात प्रकाश टाकला आहे. गायिका 'मंगल' हिच्यासोबत लग्न झाल्यानंतरही चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींच्या प्रवेशामुळे आणि सततच्या संशयामुळे त्यांच्या संसारात दुरावा वाढत जातो. दिग्दर्शक आणि असिस्टंट्सच्या संघर्षमय जीवनाचे दर्शन घडवत असतानाच, ही कलासृष्टी माणसाला कशी भुरळ पाडते आणि नंतर वास्तवाशी कशी गाठ घालून देते, याचे उत्तम वर्णन यात आले आहे. शेवटी, चित्रपटसृष्टीतील खोटेपणा, ग्लॅमर आणि मानवी नातेसंबंधांचे विदारक सत्य समोर आणत ही कादंबरी एका अस्वस्थ करणाऱ्या वास्तवावर येऊन थांबते." ***** "DEDICATED TO THE LATE GURU DUTT AND BASED ON ISMAT CHUGHTAI'S POPULAR NOVEL AJIB AADMI, THE MARATHI TRANSLATION VEGALA PRESENTS A VIVID AND REALISTIC PORTRAYAL OF THE BLACK-AND-WHITE ERA OF HINDI CINEMA AND THE STRUGGLES OF THAT TIME. THE NOVEL’S PROTAGONIST, DHARMADEV, STRUGGLES HIS WAY UP FROM BOMBAY TALKIES TO BECOME A SUCCESSFUL DIRECTOR, INTERTWINING HIS LIFE WITH VARIOUS ACTRESSES OF THE FILM INDUSTRY. IT SHEDS LIGHT ON THE DAZZLING WORLD OF FILMS, THE HARDWORKING LIFE BEHIND IT, AND THE PROFESSIONAL AND PERSONAL RELATIONSHIPS OF ARTISTS. EVEN AFTER MARRYING THE SINGER 'MANGAL', A GROWING DISTANCE CREEPS INTO THEIR MARITAL LIFE DUE TO THE ENTRY OF OTHER ACTRESSES FROM THE FILM INDUSTRY AND CONSTANT SUSPICIONS. WHILE OFFERING A GLIMPSE INTO THE STRUGGLING LIVES OF DIRECTORS AND ASSISTANTS, IT WONDERFULLY DEPICTS HOW THIS ART WORLD LURES A PERSON BEFORE BRINGING THEM FACE-TO-FACE WITH REALITY. ULTIMATELY, BRINGING FORTH THE BITTER TRUTHS OF HYPOCRISY, GLAMOUR, AND HUMAN RELATIONSHIPS IN THE FILM INDUSTRY, THE NOVEL CULMINATES IN AN UNSETTLING REALITY. "