Amrutvel Amrutvel

発行者による作品情報

प्रीती हि वेलीसारखीच आहे. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! तर सार्‍या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा - जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र - रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...प्रेमाचा अर्थ किती सुक्ष्म होता आणि ते किती मोठा असू शकतो ...याची प्रचिती येणारी वि. स. खांडेकर लिखित मराठी कादंबरी -अमृतवेल , सागर कदम यांच्या आवाजात.

ジャンル
フィクション
ナレーター
Sagar Kadam
言語
MR
マラーティー語
ページ数
05:40
時間
発売日
2020年
2月1日
発行者
Storyside IN
サイズ
234
MB