PAHILE JAGTIK MAHAYUDDHA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
ऑस्ट्रियाच्या युवराजाचा बोस्नियन तरुणाने केलेला खून ही घटना पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरली. ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनाचा आळ सर्बियावर आणून तो देश घशात घालायचा होता, तसेच रशियन रेल्वे पूर्ण होण्यापूर्वी फ्रान्स आणि रशिया या दोन्ही देशांशी युद्ध करून त्यांचा पराभव करायचा होता; पण ऑस्ट्रिया व सर्बियादरम्यान छोट्या प्रमाणावर सुरू झालेले हे युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण युरोपभर पसरले. तसेच पुढे युद्धाची खुमखुमी, युद्धग्रस्त देशांना पाठिंबा आणि विरोध, या व अशा इतर अनेक कारणांमुळे त्या युद्धात तुर्कस्तान, इटली, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका आदी देशांचाही प्रवेश झाला. हे युद्ध जरी युरोपात झाले असले तरी जगातील बहुतेक सगळ्याच देशांना त्याची या ना त्या कारणाने झळ पोहोचली. पहिल्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी व कारणे, नानाविध कारणांमुळे त्यात सहभागी झालेले लहान-मोठे देश, लढाईचे वैविध्यपूर्ण प्रासंगिक वर्णन आणि परिणामांचा सार्थ आढावा.