ILLUM
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
संपतरावांच्या डोक्यात एक गोष्ट गच्च बसली. अगदी सिमेंट काँक्रिट! संपतराव रोज आपलंच डोवंÂ खात बसला. पंधरा लाख देऊनही नाव होत नाही म्हणजे काय? काहीतरी इल्लम सापडलं पाहिजे... असं काय करावं? काय काढावं? काहीतरी चकित करणारं सापडलं पाहिजे... सगळ्या पेपरात बातमी आली पाहिजे. सगळ्यांच्या तोंडी आपलाच विषय निघाला पाहिजे. नावाचा डंका गाजला पाहिजे! नाव गाजत नाही, तर मग एवढा पैसा मिळवून तरी काय फायदा? एवढे नोकरचाकर, गडीमाणसं राबतात. एकाला दोन बंगले, गडगंज इस्टेट, सोन्याचांदीची भांडी, दागदागिने, काश्मिरी कार्पेटस् साNया जगातून आणलेल्या शोभेच्या सुंदर सुंदर वस्तू... कोणत्या गोष्टीची ददात आहे? एवढं ऐश्वर्य पायाशी लोळण घेतंय, पण त्याचा उपयोग काय? नाव नाही... एका रात्रीत नाव व्हावं, पेपरात सगळीकडं छापून यावं, असं काहीतरी इल्लम काढलं पाहिजे. आणि एक दिवस संपतरावांनी इल्लम काढलं!